मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या केडीएमसी अध्यक्षपदी मनोज घरत

दिलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार – मनोज घरत

कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार कर्मचारी सेनेच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज घरत यांची निवड करण्यात आली आहे.  
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते तथा आमदार राजु पाटील, कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष संदिप देशपांडे, कार्याध्यक्ष संतोष धुरी, सरचिटणीस उत्तम सांडव व अखिल चित्रे, राजेश उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनाने मनोज घरत यांची महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना (कल्याण डोंबिवली महानगरपालिका ) अध्यक्षपदी नेमणुक करण्यात आली आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी घरत यांनी दिली.

 269 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.