ओपन लँन्ड थकबाकी करापोटी ५ कोटी ४७ लाखांचा पालिका तिजोरीत भरणा

 इतर विकासकांनीही आपल्या ओपन लॅण्डचा थकीत कर अभय योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत भरून या योजनेचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन   

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाने मालमत्ता कर थकबाकी दारांसाठी अभय योजना सुरु केली असुन सोमवारी एका विकासकाने तब्बल ५ कोटी ४७ लाखांचा भरणा केल्याने मनपाच्या तिजोरीत भर पडली आहे.
 मनपाच्या ब प्रभाग हद्दीतील मौजे बारावे येथील गोदरेज पार्कशेजारील मोकळ्या जमिनीवरील कर सन १४-१५ पासून थकीत होता. त्यामुळे त्यास बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ही देण्यात आलेले नाही. महापालिकेने केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने, १५ ऑक्टोबर २०२० पासून जाहीर केलेल्या अभय योजनेअंतर्गत या ओपन लॅण्डच्या थकीत करापोटी (रु९कोटी ७०लक्ष) पैकी रु. ५ कोटी ४७ लाख रकमेचा भरणा सदर ओपन लॅण्डचे सब डेव्हलपर जोहर झोझवाला यांनी महापालिकेत केल्याने असल्याने मनपा तिजोरीत भर पडली आहे.   
यानिमित्ताने  इतर विकासकांनीही आपल्या ओपन लॅण्डचा थकीत कर अभय योजनेअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत भरून या योजनेचा लाभ घ्यावा आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

 303 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.