किन्हवलीत पोलिसांची नाकाबंदी

विना मास्क व वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

शहापूर : वाहतुकीचे नियम न पाळता वाहन चालविणाऱ्या व विनामास्क वाहनचालकांवर किन्हवली पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक हणमंत पवार व सहकर्मचारी यांनी जोरदार दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेणवा ते सरळगाव रस्त्यावरून अनेक वाहन चालक बेदरकारपणे वाहने चालवून अनेकांच्या जिवीतास धोका निर्माण करत आहेत,अशा बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा म्हणून किन्हवली
पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक हणमंत पवार व सहकर्मचारी यांनी सोगाव फाटा या ठिकाणी असलेल्या चौकात नाकाबंदी करून जोरदार दंडात्मक कारवाई सुरू केली
अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, मोटारसायकलला नंबर प्लेट नसणारे, फॅन्सी नंबर असलेली वाहने, ट्रिपल सीट, लायसेन्स नसणारे व मुख्यत्वे विना मास्क वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहनचालकांना रोखून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहे.
आज दुपार पर्यंतच्या कारवाईत वाहतुकीचे नियन न पाळणाऱ्या एकूण छोट्या मोठ्या ३५ वाहनांवर कारवाई करत वाहनधारकांकडून सात हजार
रुपये इतका दंड वसूल केला आहे. वाहनधारकांना वाहतुकीचे शिस्त लावण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. तसेच, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाईची विशेष मोहीमही राबविण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत पवार यांनी सांगितले.

 660 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.