पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींना आग

आग नियंत्रणात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. 

कल्याण : कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडवर असणाऱ्या सोसायटीच्या तळमजल्यावर पालिकेच्या पार्किंगमध्ये  पोलिसांकडून ठेवण्यात आलेल्या दुचाकींना  सोमवारी रात्री अचानक आग लागली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
संतोषीमाता रोडवरील विकास हाईटस् सोसायटीमध्ये तळमजल्यावर महानगर पालिकेचे राखीव वाहनतळ आहे. बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलिसांकडून कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी अनेक दुचाकी असून काल रात्री या पार्किंगमधून धूर येऊ लागल्याचे काही रहिवाशांना दिसले. अग्निशमन दलाला याबाबत माहिती कळवण्यात आल्यानंतर कल्याण फायर ब्रिगेडच्या जवनांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.  मात्र आगीमध्ये ३ ते ४ बाईक जळून खाक झाल्या असून आग नियंत्रणात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. 
दरम्यान आज सकाळी कल्याणचे एसीपी अनिल पोवार आणि महात्मा फुले पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कदाचित दिवाळीतील फटाक्यामुळे एखादी ठिणगी उडून ही आग लागली असावी असा अंदाज एसीपी अनिल पोवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच या आगीप्रकरणी तपास सुरू असल्याची माहितीही पोवार यांनी दिली.

 296 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.