इतर पुलाचे काम कधी पूर्ण करणार – भाजपचा सवाल
कल्याण : पत्रिपुलाच्या कामाचे श्रेय केंद्र सरकारचे असून इतर पुलांचे काम कधी पूर्ण करणार असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चींगवेळी उपस्थित केला आहे.
पत्रिपुलाच्या गर्डर लॉन्चींग काम सुरू आज सुरु झाले असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याठिकाणी येऊन या कामाची पाहणी केली. त्याआधीच भाजपा आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी पत्रीपुलाबाबत श्रेय केंद्र सरकारला देत केंद्र सरकारचे आभार मानत माणकोली, दुर्गाडी, कोपर, पलावा या पुलांचे काम कधी पूर्ण करणार असा सवाल राज्य सरकारला उपस्थित केला आहे.
451 total views, 1 views today