तर, आम्ही तुम्हाला मनसे शॉक देऊ – रविंद्र मोरे

ग्राहकांची वीज जोडणी कापण्याचा निर्णय घेतल्यास महावितरणला मनसेचा इशारा

ठाणे : मागील सहा ते सात महिन्यापासून सर्वत्र कोरोनाने हाहाकर उडवून दिला आहे. त्याट कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहे. त्यात महावितरण कडून पाठवण्यात आलेल्या वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना, मुख्यमंत्री व उर्जा मंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याची येण्याची घोषण केल्यानंतर आता पुन्हा त्यावरून घुमजाव करीत वीज बिल भरावेच लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होत वीज जोडणी कापायला आलात तर, आम्ही मनसे शॉक देवू असा इशारा मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला.
कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रातील उद्योग व्यवसायवर परिणाम झाला असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच वीज महामंडळाने टाळेबंदीच्या काळात पाच महिन्याचे एकत्रित युनिटनुसार नागरिकांना भरमसाठ वीज बिले पाठवून शॉक दिला आहे. या युनिटचे जर मासिक युनिटमध्ये विभाजन केल्यास वीज बिले क्मिहोवून नागरिकांना दिलासा मिळेल.त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र, या अश्वसानावरून घुमजाव करीत वीज वीज बिल कमी होणार नसल्याचे स्पष्ट करीत, वीज बिले भरावी लागणार असल्याचे सुतोवाच उर्जा मंत्र्यांनी केले आहे. त्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्य्वरून महारष्ट्र नवनिर्माण सेनेने अक्रमक भूमिकाघेत, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी मनसे कार्यलयात वीज बिलासंदर्भात अथवा जोडणी कापण्यासंदर्भात तक्रार आल्यास त्या ठिकाणी मनसे कार्यकर्ता उपस्थित राहील. तसेच वीज जोडणी कापण्याचा प्रयत्न केल्या स्कायदा हातात घेवू, मग त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभागाच्या अधिकऱ्यांची राहील असे मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी स्पष्ट करीत, वीज जोडणी कापायला आलात तर, आम्ही मनसे शॉक देवू असा इशारा देखील त्यांनी दिला.

 411 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.