महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या अधिकाऱ्यांना सूचना, पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन
ठाणे : एका बाजूला कोरानाची परिस्थीती आणि दुसऱ्या बाजुला दिवाळीचा सण या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देतानाच दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होता कामा नये असे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यानही दिवाळी नागरिकांनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आज दुपारी नागरीसंशोधन केंद्र येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी ती पूर्णतः संपलेली नाही. त्यामुळे गाफीलराहून चालणार नाही. त्यामुळे दिवाळीची सुट्टी असली तरिही मुलभूत सुविधांच्या बाबतीत नागरिकांची हेळसांड होणार नाही याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
विशेषतः पाणीपुवठा, साफसफाई याबाबतीत संबंधित विभागाने विशेष काळजी घेण्याच्या सूचना देतानाच ही दिवाळी नागरिकांनी फटाके न वाजविता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
467 total views, 1 views today