भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्या प्रयत्नांने प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २२० कुटुंबांना गृहसौख्य
ठाणे : ठाणे पुर्वेकडील कोपरी येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टीवासियांसाठी बीएसयुपी योजनेतुन मोफत दिल्या जाणाऱ्या सदनिकांना आता मुहुर्त मिळाला आहे. स्थानिक भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे तब्बल १२ वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर २२० कुटुंबांना येत्या काही दिवसात सदानिकांच्या चाव्या वाटप केल्या जाणार आहेत. त्यामुळे,या शेकडो कुटुंबियांचा वनवास कायमचा संपुन हक्काच्या घरकुलाची ‘दिवाळी भेट’ मिळणार आहे.
ठाणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने निर्धार केल्यानंतर संपुर्ण शहरातील २५२ झोपडपट्टीत राहणाऱ्या तब्बल दहा लाख रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी एसआरए तसेच बीएसयुपी योजनेतर्गत मोफत घराची योजना राबवण्यात आली.ठाणे पुर्वेकडील सिद्धार्थनगरमध्ये २००९ साली बीएसयुपी योजना सुरू झाली.येथील घरे रिकामी करून रहिवाश्यांना राबोडी,परिसरातील साकेत येथील संक्रमण शिबिरात हलवण्यात आले.तेव्हापासुन आजपर्यत तीन टर्म कालावधीत सातत्याने येथुन निवडुन येणारे नगरसेवक भरत चव्हाण यांनी या रहिवाश्याच्या सुखदुःखात तसेच,अडचणीच्या काळात नेहमी साथ दिली.संक्रमण शिबिरातील इमारतींमधील लिफ्टच्या अडचणी,मलनिःसारण वाहिन्या,नळ कनेक्शन तसेच,रहिवाश्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने साफसफाईबाबतच्या तक्रारी संबधित अधिकाऱ्यांना भेटुन किंबहुना वारंवार महासभेत आवाज उठवुन समस्या मार्गी लावल्या.
दरम्यान,सिद्धार्थनगरमधील बहुतांश झोपडीवासियांना हक्काची घरे मिळवुन दिल्यानंतर उर्वरीत इमारतींचे काम पूर्ण होऊनही २२० लाभार्थीना सदनिका मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.तेव्हा,नगरसेवक भरत चव्हाण यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरुच ठेवुन ही घरे या दिवाळीपुर्वी लाभार्थीना देण्याचा चंग बांधला.त्यानुसार,नगरसेवक भरत चव्हाण यांनी,ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासमोर रहिवाश्यांची कैफीयत मांडल्याने येत्या काही दिवसात या रहिवाशांना चावी वाटप करून सदनिका देण्यात येणार आहेत.त्यामुळे,रहिवाश्यांचा १२ वर्षाचा वनवास संपणार आहे.
बीएसयुपीमधील क्वारंटाईन सेंटरचा डाव हाणुन पाडला
ठाणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागल्याने ठाणे महापालिका प्रशासनाने कोपरीतील सिद्धार्थनगरमधील बीएसयुपीच्या इमारतीत क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.तीन वर्षासाठी या कोविड सेंटरची निविदा प्रशासनाने काढली होती.याला नगरसेवक भरत चव्हाण यांनी आक्षेप नोंदवुन विरोध दर्शवल्याने हा प्रस्ताव बारगळला.त्यामुळेच आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर शेकडो रहिवाश्यांना हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने रहिवाश्यांनी नगरसेवक भरत चव्हाण यांना धन्यवाद दिले आहेत.
433 total views, 1 views today