राष्ट्रीय ओ बि सी महासंघाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षपदी अपर्णा खाडे

सामाजिक वारसा लाभलेल्या अपर्णा खाडे यांनी सुद्धा शहापूर तालुक्यातील अनेक विधायक आंदोलनात सहभाग घेतला आहे.त्यांच्या निवडीचे सर्वानी स्वागत केले आहे.

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात दबदबा
असलेले व सलग अठरा वर्षे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन,व्हाईस चेअरमन राहिलेले व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय स्व. विठ्ठल खाडे यांच्या सुकन्या अपर्णा खाडे यांची नुकतीच राष्ट्रीय ओ.बि. सी. महासंघाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी निवड झाली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे,राजकीय समन्वयक डॉ.खुशालचंद्र बोपचे,महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉ.अशोक जिवतोडे यांनी खाडे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या निवडीची घोषणा केली आहे. विठ्ठलदादा खाडे यांच्याकडून सामाजिक वारसा लाभलेल्या अपर्णा खाडे यांनी सुद्धा शहापूर तालुक्यातील अनेक विधायक आंदोलनात सहभाग घेतला आहे.त्यांच्या निवडीचे सर्वानी स्वागत केले आहे.
शहापूर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे दिवंगत विठ्ठलदादा खाडे यांनी आपल्या मालकीची शेकडो एकर जमीन भातसा धरणासाठी दान केली आहे,बँकेचे चेअरमन असताना तालुक्यातील अनेक तरुणांना बँकेत विनामोबदला नोकरीला लावले आहे.

 908 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.