बेळगावप्रश्नी ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा

ना एकनाथ शिंदे यांना दिले पत्र

ठाणे : बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार दडपशाही करत आहे,आज महाराष्ट्रात राज्य सरकार काळा दिन साजरा करत असताना ठाण्यातील ग
हॉटेल व्यवसायिकांनी सुद्धा कर्नाटक सरकारचा निषेध करत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाला पाठींबा असल्याचे पत्र दिले
नव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले होते,त्यांच्या आवाहनाला ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी पण समर्थन दिले. मूळचे कर्नाटक राज्यातील असलेले हे सर्व हॉटेल व्यावसायिक गेले कित्येक वर्षे ठाण्यात वास्तव्यास आहेत.महाराष्ट्र आणि ठाणे आमची कर्मभूमी आहे ,त्या मुळे कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत असल्याचे पत्र देत या सर्व हॉटेल चालकांनी काळ्या फिती लावल्या होत्या. या वेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे,युवा सेना विस्तारक राहुल लोंढे उपस्तिथ होते. ठाणे हॉटेल ओनर संघटनेचे अध्यक्ष उमेश शेट्टी,रत्नाकर शेट्टी,रघुनाथ शेट्टी,प्रशांत शेट्टी यांचे सह अनेक हॉटेल मालक उपस्थित होते

 390 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.