या पीक कापणी अहवालानुसार मंडळात झालेले उत्पादन, त्याला मिळणारा हेक्टरी हमी भाव तसेच पीक विम्याचा लाभ सुद्धा या नुसार देण्यात येतो.
ठाणे : खरीप हंगामामध्ये विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी कृषी, महसूल व जिल्हा परिषद यंत्रणा मार्फत पिक प्रयोग राबविण्यात येतो. आज ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील बाळे या गावातील भातशेती प्लॉटवर पिक कापणी प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
या गावातील शांताराम बोराडे आणि बळीराम बोराडे शेतकऱ्यांच्या शेतातील भात पिकाच्या १० बाय ५ मीटर क्षेत्रात पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. निवडण्यात आलेल्या पिकाच्या प्लॉटवरील पिकांची कापणी करुन प्रत्यक्ष भात उत्पादनाची मोजणी करण्यात आली.
या पीक कापणी अहवालानुसार मंडळात झालेले उत्पादन, त्याला मिळणारा हेक्टरी हमी भाव तसेच पीक विम्याचा लाभ सुद्धा या नुसार देण्यात येतो.
यावेळी कल्याण पंचायत समिती गट विकास अधिकारी श्वेता पालवे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, कृषि अधिकारी सुनील संत , कृषि अधिकारी दिनेश घोलप, विस्तार अधिकारी अनिस तडवी, तसेच शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान डॉ.सातपुते यांनी नारिवली ग्रामपंचायतला भेट दिली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, ग्रामसेवक, उपस्थित होते.
387 total views, 3 views today