आत्मनिर्भर योजना राबवून फेरीवाल्यांवर कारवाई म्हणजे ही प्रशासनाची दुटप्पी भूमिका असल्याचा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा प्रशासनाला टोला
ठाणे : पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर एका बाजूने फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते व दुस-या बाजूने त्यांना आत्मनिर्भर बनविणेसाठी कर्ज उपलब्ध् करुन दिले जाते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली असून, त्यामध्ये नाहक फेरीवाला भरडला जात आहे. आधी फेरीवाला धोरण राबवा त्यानंतरच आत्मनिर्भर योजना राबवा अशी मागणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. तसे यवाबत पत्रदेखील मीनाक्षी शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा तसेच महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहे. तसेच ठाणे पालिकेची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप यावेळी शिंदे यांनी केला.
सध्या कोरानाच्या पार्श्वभुमीवर अनेक फेरीवाल्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, त्यांना आत्मनिर्भर बनविणेसाठी महापालिकेच्या वतीने या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेचे एकूण उद्दीष्ट २२,१०९ ठेवण्यात आले असून, त्यापैकी १९७६९ लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती १० हजार इतके कर्ज मंजूर केल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या सदर विशेष सुक्ष्म पुरवठा योजनेची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी सुरु असून आहे. मात्र कारवाई करून फेरीवाले आत्मनिर्भर होतील का असा सवाल यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
फेरीवाल्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कर्ज देणे कितपत योग्य व उचित आहे याचाही प्रशासनाने जरुर तो विचार करावा. कारण फेरीवाल्यांवर कारवाई देखील केली जात असून आत्मनिर्भर बनविणेसाठी कर्ज उपलब्ध् करुन दिले जाते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली असून, त्यामध्ये नाहक फेरीवाला भरडला जात आहे. तसेच त्यांना एक प्रकारे कर्ज उपलब्ध केल्यामुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करणेसाठी प्रोत्साहित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार कारता, अशा फेरीवाल्यांची परिस्थिती “आई जेवू घालीना, बाप भिम मागू देई ना !” अशी झालेली असल्याने पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी केली.
452 total views, 1 views today