ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांचा आरोप
ठाणे : मराठा आरक्षण संदर्भात सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळात असल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष,माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे.ओ.बी.सी.महिला मोर्चाचा ठाणे कार्यकारिणी पदनियुक्ती आणि कोरोना योद्धा सत्कार समारोह कार्यक्रम ते बोलत होते.
ठाण्यातील खोपट येथील भाजपाचा कार्यालयात ओ.बी.सी.महिला मोर्चाचा वतीने महिला मोर्चा ठाणे कार्यकारिणी पदनियुक्ती आणि कोरोना योद्धा सत्कार समारोह कार्यक्रम भाजपा ओबीसी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमूख वनिता लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी महिला मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नयना भोईर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष,माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या सह भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष,आमदार निरंजन डावखरे,प्रदेश सचिव संदीप लेले, भाजपा ओबीसी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमूख वनिता लोंढे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर,ऍड मनोज भुजबळ,भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे प्रभारी अनिल पंडीत, भाजपा ओबोसी मोर्चा सदस्य लता पगारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमात विविध पक्षातील अनेक महिलांनी भाजपा ओबीसी महिला मोर्चामध्ये प्रवेश केला.
मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार मराठा समाज बाधंवांच्या भावनेशी खेळत असल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले परंतु सुप्रीम कोर्टाने आरक्षण थांबवले आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे असे लेखी निवेदन भाजपाने मुख्यमंत्री व राज्यपाल दिले असल्याचे ओबोसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी यावेळी सांगितले . राज्यभरात भाजपा ओबोसी मोर्चाच्या संघटनात्मक वाढीच्या कामाला सुरुवात झाले आहे.देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसी मंत्रालय सुरु केले ते कार्यन्वित व्हावे,महाज्योती,सारथीच्या धर्तीवर नवीन संस्था सुरु केली त्याला निधी मिळावा,लोकडाऊनच्या काळात सर्वात जास्त आर्थिक हानी ओबीसी समाजाची झाली हातावर पोट असणाऱ्या गुरव,कुंभार,नाभिका,लोहार व इतर छोटयाछोट्या समाज घटकांना त्यांचे उपजीविकेचे साधन बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांना देखील सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे आदी प्रश्न सरकार दरबारी मांडून या भूमिकेच्या माध्यमातून ओबीसी मोर्चा पुढील काळात काम करणार आहे त्यानिमित्ताने संघटनात्मक रचना पूर्ण करावी यासाठी ओबीसी महिला मोर्चा,ओबीसी युवती मोर्चा,ओबीसी युवक मोर्चा यांची महाराष्ट्रभर कार्यकारणी जाहीर करावी व १ बूथ १० ओबीसी हा कार्यक्रम समोर ठेवून ओबीसी मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर काम करणार असल्याचे योगेश टिळेकर यांनी यावेळी सांगितले.
448 total views, 1 views today