दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने राबवण्यात आला उपक्रम
ठाणे : केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत आज अधिकारी-कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मूलन शपथ घेतली. यावेळी राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला संदेश वाचून दाखविण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) अजिंक्य पवार यांनी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शपथ दिली. त्याचबरोबर उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी सिसोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुभाष भोर, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) नितीन पालवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बडे, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) समिना शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा एच. एल. भस्मे, समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार, महिला व बाल विकास विभाग आदि विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली.
499 total views, 3 views today