वाढीव पाणी बिला संदर्भात प्रभाग समिती नुसार उपाययोजना करा


नगरसेवक भरत चव्हाण यांची पालिका प्रशासनाकडे मागणी

ठाणे : कोरोनाच्या काळात ठाणेकर नागरिकांना वीज बिलासह पाण्याची बिले देखील भरमसाट आली असल्याने ठाणे महापालिकेने लवकरात लवकर पाऊले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी नुकत्याच पार पडलेल्या सर्व साधारण सभेत केली आहे. त्याचप्रमाणे बिले पाठवण्यात येणारी एजन्सीकडे कोणत्याही प्रकारचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे अधिकचे बिल पाठवण्यात आले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे प्रभाग समिती नुसार बिले आणि त्याची माहिती असणे गजरेचे असून ठाणे महापालिकेने लवकरात लवकर योग्य ती पाऊले उचलावी अशी मागणी भरत चव्हाण यांनी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने व या कामांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी व्यस्त झाल्याने ठाणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची बिले अधिकचे देण्यात आली आहेत. या बिलामध्ये काही त्रुटी असून ऑगस्ट अखेरपर्यंत बिले देण्यात आली आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी ठाणे महापलिकेच्या वतीने विशेष मोहीम देखील राबवण्यात आली आहे. दरम्यान या त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांना सहज उपलब्ध होईल अश्या जवळच्या प्रभाग समितीमध्येच बिला संदर्भात खिडकी उपलब्ध करण्यात यावेळी अशी मागणी चव्हाण यांनी केली.
दरम्यान कामकाजाच्या दिवशी पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा आणि आपली कागदपत्रे जाऊन बिलामध्ये त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता अभियंता विनोद पवार यांनी केली आहे.

 284 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.