जिजाऊ सावित्री बाग आंदोलनाला सुरवात

शव जाळणे, पुरावा नष्ट करणे, कुटुंबाला धमकावणे या सर्व बेकायदेशीर पध्दतीची जबाबदारी मुख्यमंत्री योगी यांच्यावर ठेवून त्यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा, अशी मागणी या आंदोलनाचे प्रमुख समन्वयक माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी केली आहे.

कल्याण : उत्तर प्रदेश हाथरस प्रकरणात न्याय व्हावा याकरीता कल्याण पूर्वेत सुरू झालेल्या जिजाऊ सावित्री बागचे तीसऱ्या दिवसाचे आंदोलन पार पडले. शासन, प्रशासन न्याय देण्याच्या भूमिकेत असले पाहिजे आणि वाईट प्रवृत्ती बदलली पाहिजे. या, बदला करीता मागण्यांकरीता  शांततेत सनदशीर एक आंदोलन शनिवारपासून जिजाऊ सावित्री बाग भारत बचाव आंदोलनाच्या माध्यमातून कल्याण पूर्वे मध्ये सुरू झाले आहे.
बलात्कार, हत्या झालेल्या हाथरस कन्येसह इतर आत्याचार पीडित झालेल्या महिला, मुलींना न्याय सन्मान  हक्कासाठी शासन प्रशासनाने न्याय देण्याच्या भूमिकेतून वागले पाहिजे. याकरीता शव जाळणे, पुरावा नष्ट करणे, कुटुंबाला धमकावणे या सर्व बेकायदेशीर पध्दतीची जबाबदारी मुख्यमंत्री योगी यांच्यावर ठेवून त्यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा, अशी मागणी या आंदोलनाचे प्रमुख समन्वयक माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी केली आहे.
या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असून या आंदोलनास राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमास सोमवारी प्रमुख वक्ते म्हणून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माजी महापौर वैजयंती घोलप व कायद्याने वागा या लोक चळवळीचे संस्थापक राज असरोडकर हे होते.
माजी महापौर वैजयंती घोलप यांनी बोलताना मुलींनी सक्षम व्हावं आणि पुरुषांचा सहभाग अशा कार्यक्रमात जास्त असला पाहिजे. हा जिजाऊ सावित्री बाग असे आंदोलन प्रथमच होत आहे आणि तेही कल्याण पूर्वेतील याचे कौतुक त्यांनी केले. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तर राज असरोडक यांनी आम्ही कळत नकळत कसे या बलात्कारी, गुन्हेगारीचे समर्थन करतो हे सांगितले. महिलांना राजकीय व्यवस्थेत नगण्य प्रतिनिधित्व मिळते याबाबत खंत व्यक्त करत या करीता महिलांनी उठाव केला पाहिजे. विधान सभेत, संसदेत ५०टक्के जोपर्यंत प्रतिनिधित्व मिळत नाही तो पर्यंत महिला अन्याय अत्याचार थांबणार नसल्याचे सांगितले. 

 580 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.