अखेर महिलांना लोकल प्रवास करण्यास परवानगी

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची ट्विटरवरून मान्यता

मुंबई : मुंबई महानगरातील चाकरमानी असलेल्या महिलांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर त्यावर रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डाच्या मान्यतेचा प्रश्न पुढे करत महिलांना प्रवास करण्यास परवानगी नाकारली होती. अखेर त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आपली चुप्पी तोडत लोकल रेल्वेने प्रवास करण्यास मान्यता देण्याचे आज जाहीर करत महिलांना उद्यापासून प्रवास करण्यास मुभा राहणार असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी नवरात्रोत्सवाचा योग साधत मुंबई महानगरातील महिलांना लोकलने प्रवास करण्यास रेल्वेने परवानगी द्यावी अशा आशयाचे पत्र १६ऑक्टोंबर रोजी पाठविले होते. त्यावर उलट टपाली लगेच पश्चिम रेल्वेने अशी लगेच परवानगी देता येत नसल्याचे सांगत रेल्वे बोर्डाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगत राज्य सरकारच्या विनंतीला केराची टोपली दाखविली.
त्यावर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आणि काँग्रेसने सातत्याने रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे विभाग आणि भाजपावर सातत्याने टीकेची झोड उठविली. त्यामुळे अखेर रेल्वेमंत्र्यांनी महिलांना प्रवास करण्यास मान्यता देत असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले

 267 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.