जितेंद्र शिर्के यांची संपर्क प्रमुखपदी निवड

भारतीय मराठा संघाच्या कल्याण जिल्ह्याची असणार जबाबदारी


ठाणे : मराठा समाजाच्या विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या भारतीय मराठा संघाच्या वतीने राज्यभरात मराठा समाज एक होण्याकरिता संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख पदी शिर्के यांची निवड करण्यात आली.
मराठा समाज कामाकरिता आपले गाव सोडून शहर परिसरात जास्त प्रमाणात स्थापित झाला आहेत. यामुळे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच मराठा बंधू, भघिणी संघाच्या माध्यमातून विविध मराठा समाजाच्या समस्या सोडविण्याकरिता संघात एकत्र राहणे गरजेचे आहे. यामुळे देशभरात भारतीय मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाची योग्य रित्या बांधणी सुरू असून मूळ हेतू मराठा समाजाचा विकास हाच असल्याने जोरदार सभासद नोंदणी सर्व जिल्ह्यात होत आहे. यामुळे कल्याण शहर तसेच ग्रामीण परिसरात देखील मराठा समाज एकत्र राहण्याकरिता तसेच समाज बांधवांच्या समस्या सोडवण्याकरिता संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाशजी पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख पदी जितेंद्र शिर्के यांची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे सरचिटणीस राजेंद्र पालांडे, प्रदेश उपाध्यक्ष आनंद संकपाळ, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, प्रसिध्दी प्रमूख अमोल कदम, ठाणे- पालघर जिल्हा संपर्क प्रमूख विनोद जाधव आदी उपस्थित होते.

 449 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.