सावरोलीच्या उपसरपंचपदी मनिषा दवणे बिनविरोध

उपसरपंच पदाच्या उर्वरित अडीच वर्षांच्या काळात ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी विकासनिधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनीषा दवणे यांनी सांगितले

शहापूर : शहापूर तालुक्यातील सावरोली(सो) या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या मनिषा दुंदाजी दवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण नऊ सदस्यसंख्या असलेल्या सावरोली(सो) ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया मोहन निरगुडा आजच्या निवडणूकीच्या अद्यासी अधिकारी होत्या.ग्रामसेवक एन. व्ही. वाघमोडे यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात दवणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. मनिषा दवणे या शहापूर पंचायत समितीचे शिवसेनेचे माजी सदस्य मंगल दवणे यांच्या सुनबाई असून युवासेनेचे पदाधिकारी जितेंद्र दवणे यांच्या त्या भावजई आहेत.विद्यमान सरपंच छाया निरगुडा यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन करून ग्रामपंचायतच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करू असे आश्वासन दिले.उपसरपंच पदाच्या उर्वरित अडीच वर्षांच्या काळात ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी विकासनिधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनीषा दवणे यांनी सांगितले.

 465 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.