कोव्हीड योद्धयांनी पांढऱ्या रंगाची उधळण करत साकारली नवदुर्गा

                                                                                                                                                            

 तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या कोव्हिडं योद्धयांनी शक्तीच्या देवतेची केली आराधना

नवी मुंबई : आपण दुर्गेची अनेक रूपे पहिली आहेत, मानव जातीवर ज्या ज्या वेळी संकट आली त्या त्या वेळी ही दुर्गा आपल्या मदतीला धावून आली  आहे. आजही डॉक्टर, नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफ यांच्या रूपामध्ये  आदी माया,आदी भवानी आजही कोरोनाच्या या भयानक परिस्थिती मध्ये ही आपल्या मदतीला आली आहे. गेली सहा महिने नवी मुंबईतील नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे कोव्हीड योद्धे (महिला व पुरुष) दिवसरात्र कोरोनाशी लढत असून आज सर्वानी साक्षात नवदुर्गाची पोझ देऊन एक सकारात्मक संदेश दिला आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे डेप्युटी जनरल मॅनेजर संतोष साइल  म्हणाले, ” आपण सर्वजणच एका महाभयंकर संकटातून जात आहोत व या संकटापासून वाचविण्याचे काम प्रामुख्याने डॉक्टर, नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफ २४ तास करीत आहे. भारतामध्ये अनेक अनेक सण उत्सव  साजरे होत आहेत परंतु कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या कोव्हीड योध्यांना या सणाचे अप्रूप नसून कोरोनापासून नागरिकांना कसे सुरक्षित राहतील याचाच विचार ते अहोरात्र करीत आहेत. आज या कोव्हीड योध्यांनी एका अनोख्या ढंगात आज पांढऱ्या रंगाची उधळण करून कोरोना रुग्णांना साक्षात नवदुर्गाचे आधुनिक रूप दाखविले.”

 314 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.