होल्डिंग पोंडच्या साफसफाईचा मार्ग मोकळा 


पालिका पाठवणार कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव
आमदार गणेश नाईक यांची मागणी मान्य

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील होल्डिंग पोंडच्या  म्हणजेच धारण तलावाच्या साफसफाईचा मार्ग अखेर मोकळा झाला असून बेलापूर सारख्या परिसरात पावसाचे पाणी तुंबून  होणारे नुकसान यापुढे टाळले जाणार आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठकीमध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी होल्डिंग पोंडचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या साफ सफाईची आवश्यकता विषद केली होती. आज  सोमवारी  झालेल्या बैठकीमध्ये लोकनेते आमदार नाईक यांनी हा विषय पुन्हा एकदा उपस्थित केला. त्यावर खुलासा करताना आयुक्तांनी शहरातील सर्व होल्डिंग पोंडच्या गाळ साफसफाईचा एक प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरनाकडे या उच्च न्यायालयाने मान्यता दिलेल्या अधिकृत प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती दिली. होल्डिंग पोंडच्या  बाबतीत उच्च  न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली जनहित याचिका निकाली काढण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये बेलापूरचा बहुतांश भाग पाण्यात बुडाला होता सुमारे ८०० घरे आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते याबाबत माजी नगरसेवक डॉक्टर जयाजी  नाथ यांनी लोकनेते नाईक यांच्याकडे हा विषय मांडला होता. लोकनेते नाईक यांनी आयुक्त बांगर यांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगून कायद्याच्या चौकटीमध्ये उपाययोजना करण्याची सूचना केली होती.
सोमवारच्या बैठकीस माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत व इतर माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
खाजगी डॉक्टरांना सुरक्षा कवच प्रदान करा
कोरोना काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे खाजगी डॉक्टर हेदेखील कोरोना योद्धे आहेत महापालिकेने आवाहन केल्यानंतर खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडले होते. नवी मुंबईतील तीन डॉक्टरांचा करोना  संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेमार्फत आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि आणि खाजगी डॉक्टरांना देखील विम्याचे सुरक्षाकवच मिळायला पाहिजे अशी आग्रही मागणी  नाईक यांनी सोमवारच्या बैठकीत केली या मागणीला आयुक्त बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मास्क न वापरल्यास जादा दंड आकारा
बहुसंख्यकांच्या हितासाठी मास्क न वापरणाऱ्यांकडून वाढीव दंड घ्या मास्क वापरण्याची सूचना करणाऱ्या एपीएमसीमधील एका सुरक्षारक्षकाला परप्रांतीय मजुरांनी मारहाण केल्याच्या घटणेचा  संदर्भ देत लोकनेते नाईक यांनी काही व्यक्तींच्या बेफिकिरीमुळे इतर खबरदारी घेणाऱ्या बहुसंख्य नागरिकांना धोका निर्माण होतो, असे स्पष्ट केले. बहुसंख्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जी मोजकी मंडळी मास्क परिधान करीत नाहीत त्यांच्याकडून वाढीव दंड आकारावा एमआयडीसी आणि एपीएमसी मध्ये परप्रांतीय मजुरांची अँटीजन टेस्ट करावी, अशा सूचना केल्या.
सणासुदीच्या दिवसात अधिक सतर्क रहा
नवी मुंबईतील कोरोनाची आकडेवारी आता स्थिरावली असली तरी सणासुदीचे दिवस पाहता सण साजरा करण्याच्या उत्साहात खबरदारी पाळली जात नाही परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढतो असा धोका व्यक्त करीत कोरोना वाढीसारख्या संकटाचा पुन्हा सामना करावा लागू नये, यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासकीय यंञणांना द्यावेत, असा सल्ला नाईक यांनी आयुक्तांना केली. तशा प्रकारचे आदेश देतो, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.
उद्यानांची देखभाल करावी
देखभालीअभावी शहरातील सर्वच उद्यानांची दुरावस्था झाल्याची बाब माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांनी बैठकीत मांडली. नाईक यांनी या प्रकरणात जी काही चौकशी सुरु आहे ती पूर्ण करावी. माञ उद्यानांची योग्य प्रकारे देखभाल करावी, जेणेकरन नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशी सुचना त्यांनी आयुक्तांना केली.उद्यानांचा गैरवापर होवू नये यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, असे आश्वासन देत उद्यानांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली.
प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांसाठी प्रसंगी उपोषण
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून शहरातील सफाईचे काम येथील प्रकल्पग्रस्त कंत्राटदार करीत आले आहेत महापालिकेला स्वच्छता अभियाना मध्ये राज्यात पहिला आणि देशात तिसरा क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला आहे मात्र प्रकल्प ग्रस्त कंत्राटदारांना डावलून सध्या बाहेरील कंत्राटदारांना पालिकेत घुसविण्याचे षड्यंत्र रचण्यात आले हे कारस्थान चालू देणार नाही असा इशारा देत प्रकल्प ग्रस्तावर कोणी अन्याय करीत असेल तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ उपोषण आंदोलन करू असा इशारा नाईक यांनी दिला त्यावर या विषयी योग्य कार्यवाही करण्याचा शब्द आयुक्त बांगर यांनी नाईक याना दिला

 334 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.