किन्हवली आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव

महाराष्ट्र शासनाचा “माझे कुटुंब-माझी जबाबदारी”हा बहुउद्देशीय कार्यक्रम राबविताना दिलेल्या मुदतीच्या आत शंभर टक्के केला पूर्ण

शहापूर : महाराष्ट्र शासनाचा “माझे कुटुंब-माझी जबाबदारी”हा बहुउद्देशीय कार्यक्रम राबविण्यात तत्परता दाखविणाऱ्या किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव आज(दि.१५) किन्हवली येथे झालेल्या रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
कोविड१९ च्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमेत शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील २० गावे व ३८ पाड्यांत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी केली आहे.यात ऑक्सिजन लेव्हल,ताप किंवा मधुमेह,रक्तदाब,दमा किंवा ईतर गंभीर आजार असलेल्या रूग्णांची चौकशी करून सर्वेक्षण केले आहे.
महाराष्ट्र शासनाचा “माझे कुटुंब-माझी जबाबदारी”हा बहुउद्देशीय कार्यक्रम राबविताना दिलेल्या मुदतीच्या आत शंभर टक्के पूर्ण करून तत्परता दाखविणार्या किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांचा आज किन्हवली येथे झालेल्या रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.या वेळी शहापूर पंचायत समितीचे उपसभापती जगन पष्टे,किन्हवलीच्या सरपंच कल्पना शिद,उद्योजक अविनाश साबळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरुलता धानके,वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पवार व आरोग्य सेवक शंकर बांगर आदी उपस्थित होते

 641 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.