४१ ठिकाणी धाडी,९०हजार वीज युनिटची चोरी,१६ लाखाचा दंड
शहापूर : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दोन दिवसात वीज मीटरची तपासणी करून त्यात फेरफार करणाऱ्या व आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या ४१ जणांवर धाड टाकून ९० हजार वीज युनिटची चोरी पकडण्यात उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांना यश आले असून अंदाजे १६ लाख रुपयांची वीज चोरी किन्हवली,आसनगाव,खर्डी, सोगाव,शिरवंजे,अस्नोली,व बाजूच्या परिसरात पकडली असल्याची माहिती कटकवार यांनी दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या कारवाईत वीज मीटरची तपासणी करून त्यात फेरफार करणाऱ्या व आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या ४१ जणांवर धाड टाकून ९० हजार वीज युनिटची चोरी पकडण्यात उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांना यश आले असून अंदाजे १६ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली आहे.
वीज चोरी करणाऱ्यास भा दं वि कायदा-२००३ चे कलम १३५ व १२६ नुसार तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही क्लुप्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये. तसेच आकडे टाकून वीजचोरी करणे थांबवून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. विजेचा अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे,
तसेच महावितरण तर्फे ग्राहकांना अधिकृत विजपुरवठा करण्यासाठी मागणी केल्यानुसार केवळ २ दिवसात विजजोडणी करून देणार असल्याचे आवाहन शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी केले आहे.या धाड मोहिमेत सहाय्यक लेखापाल विशाल सानप, सहाय्यक अभियंता एस.गायकवाड, क्षिरसागर,बाबा नांगरे व शहापूर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
468 total views, 1 views today