समाजसेवक गणेश चौधरींची निवेदनाद्वारे मागणी.
शहापुर : आठवडाभरापूर्वी झालेला पाऊस व वादळामुळे हाता तोंडाशी आलेले भात पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या परिस्थितीतचा आढावा घेण्यासाठी किन्हवली आणि परिसरात आता पर्यंत कृषी अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी या पैकी कुणीही आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा मिळवून द्यावा अशी मागणी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सचिव व समाजसेवक गणेश चौधरी यांनी शहापूरच्या तहसीलदार व तालूका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात १४ हजार हेक्टर भू क्षेत्रात भात पिकांचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विना संकट भात पीके पडतील अशी अपेक्षा असताना गेले काही दिवसापासून पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. आठवडाभरापूर्वी झालेला पाऊस व वादळामुळे दाणे भरलेले भात पीक आडवे झाले.शेतात साठलेल्या पाण्यात भाताचे दाणे व पेंढा काळा निळा पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गुरांच्या वैरणीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.भातपीक उत्पादनावर मोठे संकट येऊनही परिस्थितीतचा आढावा घेण्यासाठी किन्हवली आणि परिसरात आता पर्यंत कृषी अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी या पैकी कुणीही आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सचिव व समाजसेवक गणेश चौधरी यांनी शहापूरच्या तहसीलदार निलीमा सुर्यवंशी व तालूका कृषी अधिकारी अमोल अगवान यांच्याकडे केली आहे.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते माधव भेरे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे शहापूर तालुका अध्यक्ष नितीन रोठे, धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जयवंत हरड, कुंदन निमसे आदी उपस्थित होते.
दरम्यान ” तालुक्यात नुकसान झालेल्या भागाचा पाहणी करून आढावा घेण्यात येईल,नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करताना स्थानीक तलाठी व ग्रामसेवक यांना सोबत घेऊन नुकसान भरपाईच्या कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे प्रयत्न करू असे शहापूरचे कृषी आधी अमोल अगवान यांनी सांगितले.
742 total views, 1 views today