शहापूर तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आक्रोश आंदोलन

शहापुरच्या तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांना दिले निवेदन

शहापूर : शहापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत राज्यातील आघाडी सरकार विरोधी घोषणा देउन निषेध करत आक्रोश आंदोलन करण्यात आले.
भाजपच्या महिला मोर्चाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा शीतल तोंडलीकर, शहापूर तालुका अध्यक्षा निशिगंधा बोंबे, शहापूर नगरसेविका वैदेही नार्वेकर,जिल्हा उपाध्यक्षा रंजना उघडा, सुरेखा इरनक,उषा करण,अलका झवर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले. शहापुरच्या तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांना महिला मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात भाजपचे अशोक इरनक,तालुका अध्यक्ष भास्कर जाधव,जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ भाकरे, जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड, ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदे,प्रशांत फुले,तुकाराम भाकरे, राम जागरे,विनायक सावंत, चेतन जाधव,सतीश सापळे,गिरीश सेवकांनी,शरद हजारे, जय सोगिर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 650 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.