“कोरोना बॅटल” लघुपट युट्युबवर प्रदर्शित

राठोड एंटरटेनमेंट आणि अभिजात कलासंपदा संस्थेची आहे निर्मिती

शहापूर : कोरोना बाधीत रुग्णांना व सर्वसामान्य नागरिकांनाही या आजारासोबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या काळात समाजात काही माध्यमांद्वारे अनेक समज गैरसमज पसरवण्यात आले त्याचा फटका अनेकांना बसला. या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न राठोड एंटरटेनमेंट आणि अभिजात कलासंपदा प्रस्तुत “कोरोना बॅटल” या लघुपटात करण्यात आला आहे.
या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजीत चौधरी यांनी केले असून २०१९ मधील त्यांच्या “हुज नेक्स्ट” हा लघुपट लाखो लोकांच्या पसंतीस उतरून त्याला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
“व्हिजन” या पर्यावरणविषयक लघुपटास सुद्धा दिल्ली येथील सी एम एस वातावरण या महोत्सवात नामांकन मिळाले होते. दर्जेदार लघुपट देणाऱ्या या संस्थेच्या आगामी लघुपटाची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे चित्रीकरण अभिजात कालासंपदा मुंबई आणि राठोड एंटरटेनमेंट पुणे या दोन्ही चमूच्या च्या कलाकारांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून आपापल्या घरीच चित्रीकरण केलं आहे.
अभिजीत चौधरी, भावेश राठोड, अंबिका सारंग, प्रमोद नाईक, शीतल जगताप, बाळासाहेब खंडके, विक्रम गोरे या कलाकारांनी व विशाल घनघाव, साईनाथ सुतार, अमित सोंडेकर, समर्थ काबाडी या प्रोडक्शन टिमच्या सहकार्याने या लघुपटाची निर्मिती झाली आहे. प्रत्यक्ष एकत्र न येता केलेला टिमवर्क हा सुद्धा एक कुतूहलाचा विषय ठरणार आहे.

 712 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.