टीएमटीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आपल्या कामगार नेत्याच्या आठवणींना उजाळा

ठाणे परिवहन पतसंस्थेचे अध्यक्ष, कामगार नेते मनोहर जांगळे यांना टीएमटी परिवाराकडून आदरांजली. शोकसभेत कामगारांनी वाहिली श्रध्दांजली

ठाणे : ठाणे परिवहन पतसंस्थेचे अध्यक्ष, टीएमटी एम्पलाॅईज युनियनचे खजिनदार तथा ठाणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर जांगळे यांच्या स्मरणार्थ आज ठाणे पालिका परिवहन सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पतसंस्थेचे संचालक मंडळ, युनियन पदाधिकारी आणि टीएमटीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
कामगार नेते मनोहर जांगळे (५६) यांचे गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनावर मात केल्यानंतरही श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. कट्टर शिवसैनिक असलेल्या मनोहर जांगळे यांनी टीएमटी सेवेतील कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पतसंस्थेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळवून देण्यासह याच कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी युनियनच्या माध्यमातून जांगळे यांनी आवाज उठवला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व सून असा परिवार आहे. दैनिक सामनाचे उपसंपादक – वार्ताहार विनित जांगळे यांचे ते वडील होते. आज पतसंस्थेचे उपाध्यक्ष विलास पाटील, सचिव भास्कर पवार, खजिनदार प्रविण विचारे, संचालक कैलास पवार, सतिश लादे, दिलीप चिकणे, विजया मुकादम, प्रतिभा घाडगे, किरण कदम, शशिकांत शिंदे, व्यवस्थापक दीपक दळवी, टीएमटी एम्पलाॅईज युनियन अध्यक्ष गणेश देशमुख, डाॅ. अजित बुरुड व कर्मचारी शोकसभेला उपस्थित होते. यावेळी मनोहर जांगळे यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. तसेच त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

 392 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.