सोगाव गटात राबवली विदयुत विकास योजना

सुभाष हरड यांच्या पाठपुराव्याने नऊ वीज रोहित्र मंजूर

शहापूर : सोगाव पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती सुभाष हरड यांनी सोगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांत
विदयुत विकास योजना प्रभावीपणे राबविली असून जिल्हा नियोजन समितीमार्फत आदिवासी उपयोजनेतून नऊ विज रोहित्र मंजूर करून आणले आहेत.
ग्रामीण भागात लोकसंख्या वाढली असून जुन्या रोहीत्रांवर अतिरिक्त दाब येऊन ते निकामी होतात,तर काही ठिकाणी विजेच्या अनियमित दाबामुळे अनेकांची उपकरणे नादुरुस्त झाली आहेत.या बाबत पंचायत समितीचे माजी उपसभापती व सोगाव गणाचे विद्यमान सदस्य सुभाष हरड यांनी पाठपुरावा करून सन २०१९-२० या आर्थिक वर्षात विदयुत विकास योजनेअंतर्गत सोगाव गटात नऊ ठिकाणी नवीन रोहित्र मंजूर करून आणली आहेत.
खरीवली(सो) कातकरीवाडी,लहुचीवाडी – कातकरीवाडी, रायकरपाडा (शिरवंजे), वाचकोले,खरीवली नं-१, खरीवली नंबर-२, बेलकडी (सावरोली सो), गांगणवाडी (सावरोली सो), खरीवली(सो) उपकेंद्र अशा नऊ ठिकाणी विदयुत विकास योजना प्रभावीपणे राबविली असून सहा ठिकाणच्या कामांच्या निविदा होऊन प्रत्यक्ष कामेही सुरू झाली आहेत त्या ठिकाणी आज पाहणी करण्यासाठी सुभाष हरड यांच्या सोबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार कनिष्ठ अभियंता टि के कदम ,राहुल भोईर,सरपंच बाळू वाघ, मुकुंद हरड, अनंता हरड सर तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
हि कामे मंजूर करताना भिवंडी लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांचे व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या सहकार्य लाभल्याचे सुभाष हरड यांनी सांगितले.

 369 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.