इन्फिनिक्सने ने लॉन्च केला सर्वात पॉवरफुल ‘हॉट१०’

सर्वोत्कृष्ट डिझाईन आणि डिस्प्ले, मजबूत प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा अनुभव

मुंबई : इन्फिनिक्स या ट्रांशिअन ग्रुपच्या प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने हॉट सीरीजच्या शृंखलेत सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन हॉट१० लॉन्च केला आहे. हा फोन अलॉटएक्स्ट्रा (#ALotExtra) फीचर्ससह उपलब्ध आहे. अँड्रॉइड १०एक्सओएस ७ वर ऑपरेट होणारे डिव्हाइस अल्ट्रा पॉवरफुल हेलिओ जी७० ऑक्टा-कोअर प्रोसेसर आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेजसह ६जीबी रॅमद्वारे समर्थित आहे. हॉट१० f/1.85 लार्ज अपार्चरसह १६एमपी एआय क्वाड रिअर कॅमेरा, क्वाड एलईडी फ्लॅश, सुपर नाइट मोड, एआय सीन डिटेक्शन मोड आणि ८सीएम मायक्रो लेन्स उपलब्ध आहे. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टच्या बहु-प्रतीक्षित बिग बिलिअन डेज सेलमध्ये हा फोन ९९९९ रुपये या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध असेल.
पॉवर मॅरेथॉन तंत्रज्ञानाद्वारे सक्षम अशा हॉट१० मध्ये हेवी ड्यूटी ५,२०० एमएएच बॅटरी आहे. यामुळे दीर्घकाळ भरपूर वापर झाल्यानंतरही फोन सुरू राहील. गेमिंग करताना प्रीमियम व्हिज्युअल अनुभवासाठी हॉट१० मध्ये कार्यक्षम, हाय-परफॉर्मन्स देणारे Arm Mali-G५२ क्लास ग्राफिक्स प्रोसेसर युनिट असून ते ८२०एमएचझेड स्पीडपर्यंत काम करते. हॉट१० मध्ये ३ कार्ड स्लॉट (ड्युअल नॅनो सिम+ मायक्रोSD) असून त्यात २५६ जीबीपर्यंत विस्तार होऊ शकणारी मेमरी असून ते नव्या एक्सओएस ७ स्किन अँड्रॉइड १० वर ऑपरेट होते. एक्सओएस ६.० पासून क्रांतिकारक रित्या अपग्रेड झाल्याने फोनचे युआय अतिशय मजबूत झाले आहे.
इन्फिनिक्स इंडियाचे सीईओ अनिश कपूर म्हणाले, “ हॉट सीरीज ही केवळ जागतिक बाजारपेठेसाठीच नव्हे तर भारतीय बाजारासाठीही महत्त्वाची आहे. हॉट१० मध्ये आधीच्या हॉट जनरेशनपेक्षा खूप जास्त अपग्रेडेशन आहे. हे डिव्हाइस किफायतशीर किंमतीत स्टाइल, घटक आणि पॉवर यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. यातील बऱ्याच सुविधा या श्रेणीत प्रथमच दिल्या जात असून सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याच्या इन्फिनिक्सच्या तत्त्वाचे प्रतिबिंब या क्रांतिकारी उत्पादनात दिसते. आकांक्षा, नावीन्य आणि उपयुक्तता एकत्रित करत हा सर्वगुण संपन्न फोन हा इन्फिनिक्सची एक ब्रँड म्हणून असलेली ओळख अधिक दृढ करेल.”

 321 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.