कोरोना संकटात कचरा कुंडीच्या बाहेर मास्क, हँडग्लोव्हज आणि पीपीई किट

संत ज्ञानेश्वर नगरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

ठाणे : संत ज्ञानेश्वरनगर जवळ असलेल्या रस्त्यालगतच्या कचरा कुंडीच्या आजूबाजूला औषधे,वापरण्यात आलेले पीपीई किट,मास्क अश्या वस्ती इतरत्र टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान असे वापरण्यात आलेल्या वस्तू कोणी टाकल्या याबाबत माहिती समोर आली असून या कचरा कुंडी समोर एक खासगी रुग्णालय देखील असल्याने याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कितीही प्रयत्न करत असले तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. हॉटस्पॉट ठरलेल्या वागळे इस्टेट येथे अश्या पद्धतीने हॉस्पिटलमध्ये लागणारी साहित्य रस्त्यावर पडली असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ज्या कोणी हे साहित्य फेकले असावे त्यांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याने लक्षात येत आहे. कोरोनाच्या संकटात वापरलेला मास्क, हँडग्लोव्हज आणि पीपीई किट विल्हेवाट न लावता अशा प्रकारे फेकल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २२ येथे असलेल्या ज्ञानेश्वर जवळ असलेल्या नाना नानी पार्क जवळच्या कचरा कुंडीच्या बाजुला बिनधास्तपणे वापरण्यात आलेली मेडिकलचे साहित्य टाकण्यात आले आहेत. अश्या प्रकारे टाकलेले साहित्य पाहता नागरिकांनी अधिक सावध रहावे असे आवाहन स्थानिक नागरिक सुनील चव्हाण यांनी केले असून, हे साहित्य याठिकाणी कोणी टाकले याचा शोध सुरू आहे. अशा निष्काळजीपणाने पालिका  कर्मचारी आणि इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालू नये अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 298 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.