जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरेही झाले होते आंदोलनात सहभागी
दिवा : दिवा शहरातील विविध रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिकांच्या मनस्तपाला कारणीभूत ठरत असताना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा सवाल नागरिक विचारात असताना दिवा भाजपने नागरिकांच्या याच प्रश्नाला वाचा फोडली असून दिव्यातील सत्ताधारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात रविवारी खड्डे आंदोलन केले.
भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात येथील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे ,विजय भोईर,युवा अध्यक्ष निलेश पाटील,मंडळ अध्यक्ष ऍड आदेश भगत,सचिन भोईर,जयदीप भोईर,श्रीधर पाटील,प्रशांत आंबोनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
435 total views, 1 views today