परिसरात सापडले १०० हुन अधिक कोरोनाचे रुग्ण, आजार लपवण्याऱ्यांचीही संख्या जास्त
शहापूर : शहापूर तालुक्यातील किन्हवली भागात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक कोविड रुग्ण आढळून आले असून आजार लपवणा-यांचीही संख्या लक्षणीय असल्याची बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने किन्हवलीत मोफत कोविड तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरुलता धानके व सोगाव गणाचे सदस्य तथा शहापूर पंचायत समितीचे भाजप गटनेते सुभाष हरड यांच्या पुढाकाराने किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून परिसरातील संशयित रुग्ण, किन्हवलीतील फार्मासिस्ट व इच्छूक नागरिकांची कोविड चाचणी यावेळी घेण्यात आली.वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पवार यांनी किन्हवली परिसरातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांना, कोविडसद्रुश्य लक्षणे असणाऱ्यांना तपासणीचे आवाहन केले होते.त्यानुषंगाने नागरिकांची मोफत कोरोना चाचणी घेण्यात आली. याप्रसंगी किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सचिन पवार व त्यांचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
534 total views, 1 views today