ठाणे परिवहन पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर जांगळे यांचे अल्पशा आजाराने निधन
ठाणे : ठाणे परिवहन पतसंस्थेचे अध्यक्ष, टीएमटी एम्पलाॅईज युनियनचे खजिनदार तथा ठाणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक अशी ओळख असणारे मनोहर जांगळे (५६) यांचे गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती, मात्र कोरोना मात केल्यानंतरही श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दैनिक सामनाचे पत्रकार विनित जांगळे यांचे ते वडील असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व सून असा परिवार आहे.
मनोहर जांगळे हे ठाणे परिवहन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व टीएमटी एम्पलाॅईज युनियनचे खजिनदार होते. कट्टर शिवसैनिक असलेल्या मनोहर जांगळे यांनी टीएमटी सेवेतील कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पतसंस्थेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळवून देण्यासह याच कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी युनियनच्या माध्यमातून जांगळे यांनी आवाज उठवला.
476 total views, 1 views today