ठाणे पूर्व भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

जलवाहिनी दुरूस्ती आणि स्थलांतरित करण्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवणार

ठाणे : ठाणे शहरातील नौपाडा – कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रात असलेले कन्हैयानगर जलकुंभ व धोबीघाट जलकुंभ येथील आऊटलेट जलवाहिनी सॅटिस विभागाच्या कामात बाधित होत असल्याने स्थलांतरीत करणे व क्रॉस कनेक्शन करण्याचे काम आवश्यक असल्याने तसेच काशी आई मंदिराजवळ ५०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी गळती होत असल्याने गुरूवार ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत १२ तास शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊनमुळे कन्हैयानगर जलकुंभ व धोबीघाट जलकुंभ अंतर्गत परिसर चेंदणी कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगरी, नातु कॉलनी, सावरकर नगर, वाल्मीकीनगर सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णानगर, स्वामी समर्थ मठ, आनंदनगर, गांधीनगर, सिध्दिविनायक नगर, सिध्दार्थ नगर, बारा बंगला, ठाणेकरवाडी, कोपरी गाव, जगदाळे वाडी, पै गल्ली इत्यादी परिसराचा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे .
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

 466 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.