डॉ महेश केळुसकर लिखित या संशोधन ग्रंथाचे अनघा प्रकाशनने केली आहेत प्रकाशित
ठाणे : कवीवर्य बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांवच्या तृतीय वर्ष कला-मराठी (T.Y.B.A.) या अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून डॉ.महेश केळुसकर यांनी लिहिलेल्या ‘दशावतार’ आणि ‘माझा आवाज’ या संशोधन ग्रंथांची निवड करण्यात आलेली आहे.अनघा प्रकाशन,ठाणे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रकाशित केले हे ग्रंथ सन २०२०-२१ पासून अभ्यासक्रमात लागू असतील.
‘मराठी लोकरंगभूमी’ या विषयाच्या अभ्यासासाठी दशावतार(कोकणी):स्वरूप व वैशिष्ट्ये आणि लोकरंगभूमीची संकल्पना सोदाहरण विशद करणारा ‘दशावतार’ हा ग्रंथ विद्यार्थाना अत्यंत उपयोगी पडेल.डॉ.केळुसकर यांनी आपल्या पीएचडी संशोधनावर आधारित या ग्रंथात कोकणचा दशावतार सांगोपांग समजावून दिला आहे.
त्यांचा ‘माझा आवाज’ हा ग्रंथ आकाशवाणीमधील त्यांच्या ३६ वर्ष्याच्या अबनुभवावर आणि आवाजशास्त्राच्या प्रदीर्घ अभ्यासावर आधारित असून ‘आधुनिक समाज माध्यमांसाठी लेखन व संवाद’ या विषयाच्या अभ्यासासाठी सुयोग्य आहार व व्यायाम,निवेदन-वृत्तनिवेदन-सूत्र संचालन,क्षेत्रीय वृत्तकथन (Field reporting)कसे करावे वैगरे संबंधी ‘माझा आवाज’ मध्ये अत्यंत सोप्या भाषेत माहिती देण्यात आलेली आहे.
538 total views, 1 views today