मागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजाआड

आरोपींवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

कल्याण : कल्याणमध्ये अरुंद रस्त्यावर गाडी मागे घेण्याच्या वादातून एका मागसवर्गीय कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबियाना जातीवाचक शिवीगाळ करत गाव सोडण्याची धमकी आरोपींनी दिली होती. या प्रकरणी  खडकपाडा पोलिसानी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. या प्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली या आरोपीना कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. तर या प्रकरणातील फिर्यादी भुजंगराव कांबळे यांनी हा गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत असून मी आणि माझे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. मला पालिसांनी पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी केली आहे. तर या प्रकरणी एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे फिर्यादीचे वकील दिलीप वळवंज यांनी  सांगितले.

46 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *