फार्मासिस्ट दिनानिमित्त कोविड योद्धा पुरस्काराचे वितरण

किन्हवली, शेणवे व डोळखांब येथील फार्मासिस्ट व मेडिकल दुकानातील कर्मचारी यांचा कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मान केला

शहापूर : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून कोकण विभाग पत्रकार संघाच्या शहापुर शाखेने किन्हवली, शेणवे व डोळखांब येथील फार्मासिस्ट व मेडिकल दुकानातील कर्मचारी यांचा कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मान केला. शहापूर तालुकाध्यक्ष शामकांत पतंगराव, उपाध्यक्ष हरेश साबळे,सचिव विश्वजीत घायवट,खजिनदार नितीन ठाकरे,कार्याध्यक्ष अनिल भेरे व निमंत्रक संदीप चौधरी आदी पदाधिकारी यांनी प्रत्येक मेडीकल दुकानात जाऊन फार्मासिस्ट व कर्मचारी यांचा सन्मान केला. या वेळी नवनिर्माण फाउंडेशन या व्यसनमुक्ती केंद्राचे सहाय्यक संचालक राजेश घागस यांनीही पदक दिले.
तालुक्यातील उर्वरित फार्मासिस्ट व त्यांचे सहकर्मचारी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
मुरबाड तालुक्यातील भादाने या गावचे संजय हंडोरे – पाटील हे कोकण विभाग पत्रकार संघाचे कोकण प्रदेश अध्यक्ष आहेत.हा पत्रकार संघ सातत्याने विविध सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवित असतो. आजच्या या कार्यक्रमाने आनंदीत झालेल्या सर्व फार्मासिस्ट यांनी पत्रकारांना धन्यवाद दिले.

 380 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.