क्रीडाप्रेमी महापौर ; देवळेकर साहेब

कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणींना क्रीडा प्रशिक्षक आणि समीक्षक अविनाश ओंबासे यांनी दिलेला उजाळा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध स्पर्धांचा कार्यक्रम असो अन्यथा क्रीडा महोत्सव कल्याण मधील क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच माजी  महापौर व नगरसेवक राजेंद्र देवळेकर साहेबांनी मदतीचा आणि सहकार्याचा हात दिला. महापौर कालावधीत साहेबांनी घोलप नगर येथे महापौर चषक कबड्डी स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली होती. त्याच मैदानावर क्रिकेट प्रशिक्षण सुद्धा नुकतेच त्यांनी आता सुरू केले होते.आपल्या वॉर्डांमध्ये विविध स्पर्धांना साहेबांनी नेहमीच सहकार्य केले असाच घोलप नगर
मधील एका स्पर्धेचा प्रसंग आठवतो…
साहेब नगरसेवक असताना १४,१५ वर्षापूर्वी स्केटिंग स्पर्धेसाठी आम्हाला कल्याण मध्ये जागा भेटत नव्हती. जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा कल्याण मध्ये घेण्याचे ठरविल्यानंतर आम्ही बरेच प्रयत्न केल्यानंतर ही कल्याण डोंबिवली मध्ये रोडरेस स्पर्धा घेण्यासाठी जागा (रोड) भेटली नाही शेवटी देवळेकर  साहेबांनी त्यांच्या वॉर्डांमध्ये घोलप नगर या विभागांमध्ये असणारा  रोड आम्हाला उपलब्ध करून दिलाच..शिवाय स्पर्धा संपूर्ण पार पडेपर्यंत देवळेकर साहेब स्वतः आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते जेणेकरून स्पर्धकांना कोणतीही अडचण येऊ नये सर्व स्पर्धेमध्ये साहेब प्रत्येक ठिकाणी पालक व खेळाडू यांच्याबरोबर ते संवाद साधत फिरत होते. साहेब स्टेजवर न बसता खाली स्पर्धेची मजा घेत  होते परतू असे  साहेब खाली फिरत असताना आमच्यावरील दडपण होते व योग्य ही वाटत नव्हतं आम्ही कित्येक वेळा त्यांना समोर जाऊन साहेब स्टेजवर बसा अशी विनंती केल्यानंतर  साहेबांनी सांगितलं मी खेळाडूंसाठी आणि खेळासाठी आज तुमच्या बरोबर येते उभा आहे त्यामुळे मी स्टेज वर बसण्यासाठी नाही आलो. तुमची संपूर्ण स्पर्धा व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठीच मी आलो आहे आणि आमची जिल्हास्तरीय स्पर्धा घोलप नगर येथील रोडवर साहेबांच्या सहकार्यामुळे त्यावेळेस यशस्वीरित्या संपन्न झाली.फक्त स्पर्धा संपन्न झाली नाहीतर स्पर्धेला लागणारी सर्वतोपरी मदत साहेबांनी त्यावेळेस आम्हाला केली होती. ४ वर्षांपूर्वी कल्याण क्रीडा महोत्सव याच्या उद्घाटनासाठी  साहेबांना अन्य दोन-तीन कार्यक्रम एकाच वेळेस असतानाही डोंबिवलीला ह भ प सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथे कल्याण क्रीडा महोत्सवचे उद्घाटन करून खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी साहेबांनी पाच मिनिटं का होईना पण आवर्जून उपस्थिती लावली होती.
क्रीडा क्षेत्रातील कोणतेही प्रश्न आणि समस्या घेऊन गेल्यानंतर कधीही त्यांच्याकडून नकार भेटला नाही नेहमी सहकार्याची भूमिका साहेबांनी घेतली.. तसेच कल्याण डोंबिवली मधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू असो स्पर्धेमध्ये पदक किंवा सहभाग घेऊन आल्यानंतर ही त्या खेळाडूंना शाब्बासकीची थाप साहेबांनी त्याच्या पाठीवर नेहमीच ठेवली.. खेळाडूला नेहमीच सहकार्य आणि कल्याण डोंबिवली मध्ये खेळांना चांगले वातावरण निर्मितीसाठी साहेब केलेले काम विसरता येणार नाही.
माजी महापौर व नगरसेवक देवळेकर  क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच सहकार्य करण्यासाठी तयार असायचे कल्याण-डोंबिवलीतील क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील.

 357 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.