ठाण्यात घडणार कानाच्या शस्त्रक्रियेचा जागतिक विक्रम

डॉ. आशिष भूमकर करणार शस्त्रक्रिया.
जगभरातील डॉक्टर शस्त्रक्रिया लाईव्ह पाहणार.

ठाणे : ठाण्याच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. ठाण्याचा एक सुपुत्र जागतिक विक्रम करून ठाण्याचे नाव इतिहासात नोंदविण्यास सज्ज झाला आहे.
सुप्रसिद्ध ई.एन.टी. सर्जन डॉ. आशिष भूमकर हे कानावरची क्लीष्ट शस्त्रक्रिया पार पाडणार असून ठाण्यात होणारी ही शत्रक्रिया जगभरातले हजारो डॉक्टर थेट ऑनलाइन पाहणार आहेत.कानाच्या तीन भागांच्या शस्त्रक्रिया डॉ.भूमकर तिन रूग्णांवर एकाच दिवशी करणार आहेत.
डॉ.आशिष भूमकर हे ठाण्यातील नावाजलेले प्रसिद्ध नाक,कान, घसा तज्ञ आहेत.गेल्या अनेक वर्षात त्यांनी हजारो शस्त्रक्रिया करून रुग्णांना दिलासा दिला आहे.तेच डॉ. भूमकर आता येत्या २७ सप्टेंबर रोजी नवा जागतिक विक्रम आणि इतिहास रचण्यासाठी सिद्ध झाले आहे.येत्या रविवारी डॉ. भूमकर हे संपूर्ण कानावर शत्रक्रिया करणार आहेत.या शस्त्रक्रियांचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण होणार आहे.या शस्त्रक्रिया
Cochlear implant सकाळी १० ते दुपारी १stepedotomy दुपारी १ ते २आणि microtia– atresia repair दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असून या एकूण शस्त्रक्रियेत rib cartilage, harvesting,ear sculpting,atresia drilling, आणि ossicular repairing आदी कठीण शस्त्रक्रिया एकाच टप्प्यात केल्या जाणार आहेत.
रविवारी सकाळी १० वाजता या शस्त्रक्रियेला सुरुवात होणार असून २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या विक्रमासाठी डॉ. आशिष भूमकर व त्यांची टीम सज्ज झाली आहे.

 377 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.