डॉलर वधारल्याने सोन्याचा भाव घसरला

महामारीचा विस्तृत प्रभाव आणि अमेरिका-चीनदरम्यान वाढता तणाव यामुळे सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याची मागणी वाढू शकते असा अंदाज वर्तवला जातोय

मुंबई : अमेरिकी डॉलरमध्ये उच्चांकी सुधारणा झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली. परिणामी इतर चलनधारकांसाठी पिवळा धातू महाग झाला. तथापि, कोव्हिड-१९ च्या वाढत्या संख्येमुळे सोन्याची मागणी वाढू शकते. कच्च्या तेलाने उच्चांकी कामगिरी करत, भांडवल विक्रीमुळे किंमतीत सुधारणा दर्शवली. विषाणूची पुन्हा लाट आल्याने बेस मेटलचे दरही घसरले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: अमेरिकी डॉलरने मागील दोन महिन्यांतील उच्चांकी मूल्य गाठल्याने आज स्पॉट गोल्डचे दर ०.६९% नी घसरले व ते १८९९.३ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. इतर चलनधारकांसाठी पिवळा धातू मात्र महाग झाला. अमेरिकी धोरणकर्त्यांनी महामारीने विस्कळीत झालेली अर्थव्यववस्था सुधारण्यासाठी आणखी मदतपर पॅकेज देण्याचे संकेत दर्शवले नाहीत. त्यामुळे सोन्याचे दर आणखी घसरले. सध्याच्या स्थितीवर अमेरिकी फेडरल अधिकाऱ्यांचे मूल्यांकन काय आहे, यावर बाजारकर्त्यांचे बारकाईने लक्ष आहे.
युरोझोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्याने सोन्याच्या दरातील घसरण मर्यादित राहिली. कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने आर्थिक सुधारणेच्या आशा मावळू लागल्या आहेत. तथापि, महामारीचा विस्तृत प्रभाव आणि अमेरिका-चीनदरम्यान वाढता तणाव यामुळे सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याची मागणी वाढू शकते.
कच्चे तेल : मोठ्या अस्थिरतेतून दर सुधारल्यानंतर डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.७% नी वाढले व ते ३९.३ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. तथापि, कोव्हिड-१९ च्या वाढत्या रुग्णांमुळे तसेच लिबियन तेल उत्पादन पुन्हा सुरू झाल्याने तेलातील नफा मर्यादित राहिला. लिबियन तेल उत्पादन पुन्हा सुरू झाल्याने जागतिक क्रूड मार्केटमध्ये जवळपास दररोज लाखो बॅरल तेल समाविष्ट होईल. तथापि, डॉलरचे मूल्य वधारले व जागतिक तेल मागणीतील घसरणीमुळे तेलातील नफ्याबाबत शंकाच आहे.
बेस मेटल्स : कोव्हिड-१९ च्या रुग्णांत वाढ झाल्यामुळे एलएमईवरी बेस मेटलचे दर लाल रंगात स्थिरावले. त्यामुळे औद्योगिक धातूची स्थितीही झाकोळलेली राहिली. परिणामी बेस मेटलच्या मागणीवरही परिणाम झाला. आर्थिक सुधारणेला आधार देण्यासाठी अमेरिकेकडून आणखी प्रोत्साहनपर मदत मिळण्यातील अनिश्चिततेमुळे बाजाराच्या भावनांमध्ये निराशा आली. यामुळे औद्योगिक धातूंवर आणखी दबाव आला. तथापि, अमेरिकी डॉलरचे मूल्य वधारणे आणि अमेरिकी फेडने वेगाने आर्थिक सुधारणा होण्याची अपेक्षा केल्याने बेस मेटल इतर चलनधारकांसाठी महाग झाले.

 509 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.