शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुरवणार सोयीसुविधा
शहापूर : गोर गरीबांना सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार व आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन व्हावे यासाठी शिवसेनेकडून वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शहापुर तालुका आरोग्य प्रमुख पदी मिलिंद सुधाकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सदस्य मंगेश चिवटे यांनी या निवडणीचे पत्र दिले आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार गोर गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भात मदत करणे.
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मार्गदर्शन मिळावे, पंतप्रधान वैद्यकीय सह्यायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यासारख्या ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रयत्नशील राहणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, जेष्ठ नेते काशिनाथ तीवरे, संतोष शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आपली निवड झाल्याचे मिलिंद देशमुख यांनी सांगितले.
935 total views, 1 views today