राज्यातील सत्तेत सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केले पराभूत
शहापूर : शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची गणली गेलेल्या किन्हवली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या दिपाली बाळकृष्ण विशे यांची बहुमताने निवड झाली. राष्ट्रवादीच्या अर्चना बांगर यांनी सुद्धा उपसरपंच पदाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
काही सदस्यांनी गुप्तमतदानाची मागणी केल्यानंतर अद्याशी अधिकारी सरपंच कल्पना शिद यांनी त्यास अनुमती दिली व सभागृहातील एकूण ११ सदस्यांपैकी दिपाली विशे यांच्या पदरात ७ सदस्यांनी आपली मते टाकल्याने शिवसेनेचा विजय सुकर झाला.
माजी उपसरपंच सुरैय्या पठाण,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, उपतालुका प्रमुख विकास विशे,विभाग प्रमुख लक्ष्मण बांगर,शहरप्रमुख मनोज भोईर,युवासेनेचे युवा अधिकारी संदीप निमसे,शहर अधिकारी गौरव शिंदे,अविनाश साबळे,निखिल धानके,अक्षय शिंदे आदींनी नवनिर्वाचित उपसरपंच दिपाली विशे यांचे अभिनंदन केले.
680 total views, 1 views today