१०६ वर्षीय वुध्द महिलेने केली ७ दिवसात कोरोनावर मात

                      

        कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले  यांच्या चमूने १०६ वर्षीय महिलेस कोवीड उपचार करीत केले कोरोना मुक्त 

  कल्याण : सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, मनपा  कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले  यांच्या चमूने १०६ वर्षीय महिलेस कोवीड उपचार करीत कोरोना मुक्त केल्याची दिलासादायक कामगिरी केली आहे.
डोबिंवली पश्चिमेतील आनंदीबाई पाटील या १०६ वर्षीच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. परंतु डोंबिवली येथील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, मनपा कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना १३ सप्टेंबर रोजी दाखल करून घेतले. २० सप्टेंबर रोजी उपचाराअंती, आनंदीबाई पाटील या कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे कोविड समर्पित रुग्णालयातून  अवघ्या सात दिवसामध्ये डिस्चार्ज   देण्यात आला.  त्यामुळे कोविड-१९  चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन,  डॉ. राहुल घुले आणि त्यांचे सहकारी यांच्यावर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉ. राहुल घुले यांचे कौतुक केले आहे.  तर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता कोरोनाला न घाबरता  लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करीत निदान करून योग्य वेळी रूग्णालयात उपचार घेत कोरोनावर मात करता येते असे त्यांनी सांगितले.

 548 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.