साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन

वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या तथा कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांचे आज दुपारी १२.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ९२ वर्षाच्या होत्या. तसेच मागील काही महिन्यापासून त्या आजारी होत्या. पाचव्या लोकसभेमध्ये त्यांनी उत्तर मध्य मुंबईचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच त्या कम्युनिस्ट पक्षातही सक्रिय होत्या. दरम्यान त्याचा साहित्य विश्वात चांगलाच दबदबा होता. त्यांच्या पश्चात कन्या, मुलगा आणि नातवंड असा परिवार आहे.
कॉ.रोझा देशपांडे यांचा जन्म १९२८ साली झाला.त्यांचे वडील कॉ.डांगे, आई ऊषाताई यांनी त्यांचे नाव रोझा या जर्मन कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या रोझा लक्झेंम्बर यावरून ठेवले. गिरणी कामगारांचे अभूतपूर्व संप चालू होते. कॉ.डांगे तुरुंगात असत.ऊषाताई रोझाला संपात गिरिणीच्या गेटवर घेऊन जात. त्या संप,संघर्ष या वातावरणात वाढल्या.
गिरणी कामगारांच्या आंदोलनात त्या अग्रभागी राहिल्या. त्या प्रभावी वक्त्या होत्या.कॉ.डांगे यांच्या प्रमाणेच छोटी वाक्ये पण राजकीय प्रभावी विचार यांनी त्या हजारोंच्या सभा मुग्ध करत असत. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्या अग्रभागी होत्या.
गिरणी कामगारांबरोबरच फार्मासिटीकल कामगार हे त्यांचे क्षेत्र होते.जॉन्सन ॲन्ड जॉन्सन सारख्या अनेक फार्मासिटिकल कंपन्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली युनियन होत्या.त्याकाळी फार्मासिटीकल कंपन्यांमध्ये महिला मोठ्या संखेने होत्या.गरोदर राहिल्यास त्यांना कामावरून काढून टाकत असत.त्यांनी ह्याविरोधात लढा देऊन ही मालकांची अरेरावी बंद पाडली.
रोझा देशपांडे या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ऊमेदवार म्ह
णून मध्य मुंबईतून १९७४ सालच्या पोटनिवडणुकित निवडून आल्या.कॉग्रेसच्या रामराव आदिक यांचा त्यांनी पराभव केला.पुढे त्या कॉ.डांगे यांच्याबरोबर अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्षात गेल्या.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातिल आंदोलनकर्त्यांना दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीत त्या होत्या.त्यांनी या आंदोलनात तुरुंगवास झालेल्या आंदोलकांना न्याय दिला. त्यांची स्मरणशक्ती वृद्धपकाळातही तल्लख होती.अनेक व्याख्यानाला त्या जात असत.विसाव्या शतकातील लढवय्यांची पिढीच्या त्या प्रतिनिधी होत्या.

 442 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.