शिवसेनेचे प्रदीप जंगम यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपात दाखल

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

ठाणे : शिवसेनेच्या सहकार विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रदीप जंगम, उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र गिरी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम झाला.
भाजपाचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रदीप जंगम यांच्याकडे शिवसेनेच्या सहकार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांनी ठाणे शहरात अनेक कार्यक्रम केले आहेत. तर शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष रमेशचंद्र गिरी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या दोघा नेत्यांबरोबरच सहकार विभागाचे सरचिटणीस राजेश सिंह,, चिटणीस किरण शाह, ज्येष्ठ समाजसेवक दीनानाथ पांडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करीत आहोत. यापुढे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात ठाणे शहरात कार्य करू, अशी प्रतिक्रिया प्रदीप जंगम व रमेशचंद्र गिरी यांनी व्यक्त केली.

 562 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.