ठाणे : जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो, महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे हा जनता दरबार घ्यावा. असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केले. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील सांगितले आहे, की नवी मुंबईत जनता दरबार घ्या असेही त्यांनी यावेळी सांगितले. एकूणच नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यावर ठाम असल्याचे सांगत एकप्रकारे आता एकनाश शिंदे आणि अजित पवार यांना नवी मुंबईत जनता दरबार घेण्यासाठी आव्हानच केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
96,528 total views, 665 views today