अखेर दिघा गाव रेल्वे स्थानक आज सुरू होणार – खासदार राजन विचारे यांनी केलेल्या संघर्षाला यश

प्रतिनिधी – गेल्या आठ महिन्यापासून तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक व्हीआयपींच्या प्रतीक्षेत रखडले होते. हे स्थानक सुरू व्हावे यासाठी शिवसेना नेते, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री तसेच रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून अनेक पत्रं त्यांच्या स्वाधीन केली होती. परंतु याची दखल घेतली जात नव्हती. खासदार राजन विचारे यांनी या दिघा गाव रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम घेऊन दहा हजार लोकांच्या सह्या घेतलेली कागदपत्रे व नागरिकांच्या प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांना दिले.

नुकताच युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनीही या स्थानाला भेट दिली. तयार झालेले दिघागावं रेल्वे स्थानक का सुरू करीत नाही असा जाब सरकारला विचारल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारला दि.१२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाच्या उद्घाटनला येणार होते. परंतु त्यामध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याचे निश्चित नव्हते. परंतु ते आता निश्चित झाले असून नुकताच खासदार राजन विचारे यांना रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांचे पत्र प्राप्त झाले आहे.

दिघा गाव रेल्वे स्थानकासाठी पाठपुरावा

ठाणे व कल्याण या दोन लोकसभा क्षेत्राला जोडणारा ऐरोली – कळवा एलिवेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून सन २०१४-१५ पहिल्याच रेल्वे बजेटमध्ये ४२८ कोटीची मंजुरी मिळवली होती.या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झाले.

प्रत्यक्षात कल्याण लोकसभा मतदार संघातील कळवा एलिवेटेड रेल्वे स्थानक व मार्गीकेसाठी १०८० झोपड्यांचे पुनर्वसन करावे लागणार होते.

परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे भूसंपादन सर्वे करण्यासाठी रेल्वेला अडथला येत असल्याने दि.२०/०६/२०१७ रोजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग व जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना पत्राद्वारे संरक्षण देऊन सर्वे करण्याची मागणी करण्यात आली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. २७/१०/२०१७, दि.१५/०२/२०१८, दि. २५/०४/२०१८ रोजी प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती करण्यात येत होती.

या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन मंजूर झालेला निधी केंद्र सरकारकडे परतू नये म्हणून सदर प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करण्यासाठी एमआरव्हीसीकडे पाठपुरावा केला.

दिघा रेल्वे स्थानकासाठी जाणारा रस्ता, पाण्याची लाईन, पार्किंग तसेच मल- निसारण लाईन यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेसाठी MIDC, एम एस इ बी, महानगरपालिका यांच्यासोबत बैठका घेऊन परवानगी मिळवून घेतली.

दोन वर्षानंतर प्रत्यक्ष जागेवर दि. ७ मे २०१८ रोजी दिघा रेल्वे स्थानकाचे कामाचे भूमिपूजन केले.

या दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळण्यासाठी दर ३ महिन्यांनी पाहणी दौरा आयोजित केला जायचा.

मा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दि.०३/०६/२०२३, दि. २२/०८/२०२३ रोजी दिघा रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

मा. केंद्रीय रेल मंत्री रावसाहेब दानवे यांना दि. ११/०८/२०२३, दि. २२/०८/२०२३, दि.३०/१०/२०२३ रोजी दिघा रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

तसेच दि.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी सह्यांची मोहीम राबवून त्यासंदर्भात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे देखील पत्रव्यवहार केला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे फायदे

नवी मुंबई शहरात नोकरीनिमित्त कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक येत असतात या रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात येऊन हार्बर मार्गावरील वाशी लोकल पकडावी लागते त्यामुळे या प्रवाशांचा वेळ ताकद खर्ची पडत असते या प्रवाशांना डायरेक्ट नवी मुंबईमध्ये प्रवेश मिळण्यासाठी हा ऐरोली कळवा एलिव्हेटेड प्रकल्प महत्त्वाच ठरणार आहे तसेच यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार ही कमी होणार आहे त्यामुळे ठाण्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल.

*नवीन दिघा रेल्वे स्थानकात कसे असणार*

फलाट 1/2 व 3/4

फलाटाची लांबी 270 व रुंदी 12 मीटर

भुयारी मार्ग 5

सरकते जिने 6

लिफ्ट 2

दोन्ही बाजूस पार्किंग व्यवस्था 400+400

दोन्ही बाजूस G+2 इमारत असून त्यामध्ये 6+6 तिकीट खिडकी व कार्यालय

शौचालय 2

पाण्याची सोय (2 वॉटर कुलर फलाट) 1/2 व 3/4

 473,906 total views,  2,277 views today

Leave a Reply

Your email address will not be published.