महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे
निरंजन डावखरे यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे, दि. ३ (प्रतिनिधी) : महात्मा फुले व आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीमधून कोर्ट नाका येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपूजन आमदार डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमदार डावखरे यांच्याबरोबरच भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेविका पूजा वाघ, सचिन केदारी, कृष्णा भुजबळ, नयना भोईर, सचिन शिंदे, मंगेश आवळे, प्रफुल्ल वाघोले आदींची उपस्थिती होती.
विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे साहेबांची ठाणे शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रसार व नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी महात्मा ज्योतिबा फुले-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्टा उभारण्याची कल्पना होती. त्यानुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून कोर्टनाका येथे कट्टा उभारण्यात येत आहे.

 26,273 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.