ठाण्यातील युवा क्रिकेटपटूंना लहान वयातच अव्वल दर्जाचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला मिळावे म्हणून शताब्दी वर्षांपासून १४ वर्ष वयोगटाची स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असे डॉ. राजेश मढवी यांनी सांगितले.
ठाणे : स्पोर्टिंग क्लब कमिटीतर्फे शताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात प्रथमच मुंबई क्रिकेट संघटनेच्या १४ वर्ष वयोगटाच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी सांगितले.
ठाण्यातील युवा क्रिकेटपटूंना लहान वयातच अव्वल दर्जाचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला मिळावे म्हणून शताब्दी वर्षांपासून १४ वर्ष वयोगटाची स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असे डॉ. राजेश मढवी यांनी सांगितले. या स्पर्धेत ठाण्यासह नवी मुंबई, मुंबई, विरार, कल्याण, डोंबिवली, भिवंडी येथील १६ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटी, ठाणे फ्रेंड्स यूनियन, दैवेज्ञ क्रिकेट क्लब, जॉन ब्राईट क्रिकेट क्लब, साईनाथ क्रिकेट क्लब, डी. वाय. पाटील, संगम स्पोर्ट्स क्लब,बॉम्बे यूनियन, हिंदसेवक क्रिकेट क्लब, मॉर्डन क्रिकेट क्लब, यूनियन क्रिकेट अकॅडमी, स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब, रॉकेट क्रिकेट क्लब, डोंबिवली क्रिकेट क्लब, मांडवी मुस्लिम आणि बोरिवली क्रिकेट क्लब आदी संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील सामने दोन दिवसीय असणार असून बाद पद्धतीने हे ९-१०, १३-१४ आणि १६-१७ नोव्हेंबर रोजी ठाणे, विरार, कल्याण,मुंबई आणि नवी मुंबईतील मैदानांवर खेळवले जातील. स्पर्धेला निवड चाचणीचा दर्जा असल्याने या वयोगटाच्या वरळी स्पोर्ट्स क्लब आणि चंदू पंडित क्रिकेट क्लबच्या स्पर्धेत खेळणाऱ्या मुलांना सदर स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मुंबई क्रिकेट संघटनेच्या या निर्बंधांमुळे उपनगरातील जास्तीत जास्त क्रिकेटपटूंना निवड चाचणी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती स्पोर्टिंग क्लब कमिटीचे सचिव दिलीप धुमाळ यांनी दिली.
2,014 total views, 1 views today