नमिष पाटीलचे ३ धावांत बळींचे पंचक

नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा ओमकार इंटरनॅशनल स्कुलच्या कर्णधाराचा निर्णय नमिषने आपल्या भेदक गोलंदाजीने फोल ठरवला.

ठाणे : नमिष पाटीलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सेंट रॉक्स हायस्कुलने ओमकार इंटरनॅशनल स्कुलचा १० विकेट्सनी दणदणीत पराभव करत मुंबई शालेय क्रीडा संघटना आयोजित हॅरीस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडताना नमिषने ५ षटकात दोन निर्धाव षटकासह अवघ्या ३ धावांत पाच विकेट्स आपल्या खिशात टाकल्या.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा ओमकार इंटरनॅशनल स्कुलच्या कर्णधाराचा निर्णय नमिषने आपल्या भेदक गोलंदाजीने फोल ठरवला. नमिषने प्रतिस्पर्धी संघाचा अर्धा संघ झटपट गुंडाळून त्यांना अवघ्या २१ धावांवर रोखले. नमिषला तोलामोलाची साथ देताना ३विकेट्स मिळवल्या. भव्य कुमारच्या १० धावांचा अपवाद वगळता ओमकार इंटरनॅशनल स्कुलच्या सात जणांना भोपळाही फोडता आला नाही. उत्तरादाखल सेंट रॉक्स हायस्कूल संघाच्या रुद्र के आणि वरुण घोणे या सलामीच्या जोडीने २२धावांची भागीदारी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. रुद्रने आक्रमक १४ धावांची खेळी केली तर वरुणने नाबाद ३ धावा केल्या.

 270 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.